पृथ्वीच्या हवामानबदलाचे उग्र स्वरूप
गेल्या दहा वर्षांत उष्णतेची लाट, जंगलातील वणवा, महापूर, ढगफुटी इत्यादींबद्दलच्या बातम्या ऐकायला/वाचायला मिळाल्या नसतील, त्यापेक्षा जास्त प्रमाणात मागच्या वर्षी त्याबद्दल ऐकायला/वाचायला मिळाल्या आहेत. जुलै २०२३ मध्ये उष्माघाताने अनेक लोक मेले. जुलै-ऑगस्टमध्ये उत्तरभारतात व ऑक्टोबरमध्ये सिक्किम राज्यात महापूर आल्यामुळे व भूस्खलनामुळे शेकडोंनी जीवितहानी झाली, हजारो बेघर झाले. पिकांचे नुकसान झाले व रस्ते, पुलांसारख्या मूलभूत सुविधांची पडझड …